अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ कर्ज
भारत हा एक जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश आहे तसेच एकूण लोकसंख्येच्या 54 टक्के लोकसंख्या हि वय वर्षे 25 च्या आतील आहे. म्हणून या तरुण वर्गास कुशल बनविणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुशल मनुष्यबळाची गरज भागविणे व या उत्पादन क्षमता वयोगटातील उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार करण्यास सक्षम करून त्यांचे जिवनमान उंचावण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य्य पुरविण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सुशिक्षित कुशल तरुणांना स्वतःचा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी किंवा सुरु असलेल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी 10 ते 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो.
vअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत खालील प्रमाणे तीन योजना राबविल्या जातात
1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
2. गट कर्ज व्याज परतावा योजना
3. गट प्रकल्प कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत खालील प्रमाणे तीन योजना राबविल्या जातात
1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
2. गट कर्ज व्याज परतावा योजना
3. गट प्रकल्प कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करताना आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे)
जातीचा दाखला
वयाचा दाखला
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
प्रकल्प अहवाल
बँकेतून कर्ज घेताना सादर करावयाची कागदपत्रे
आधार कार्ड
राशन कार्ड
वीज बिल
उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
बँक खात्याचे स्टेटमेंट
सिबिल रिपोर्ट
व्यवसाय-प्रकल्प अहवाल
व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे
बँक कर्ज मंजुरी पत्र
बँक स्टेटमेंट
उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
व्यवसाय प्रकल्प अहवाल
व्यवसायाचा फोटो
आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
अर्जदार व्यक्तीने केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज मिळवले असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
अर्जदार व्यक्ती बँक / वित्त संस्थेचा थकबाकीदार असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
अर्जदाराने अर्जात खोटी तसेच दिशाभूल करणारी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
अर्जदाराने एकाच वेळी अनेक वेळा अर्ज केल्यास बाकीचे अर्ज रद्द केले जातील. [अण्णासाहेब पाटील कर्ज योजना]
आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
जर तुम्हाला ही या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर 7057389072 या नंबर वन call करू शकता
#loan #annsahebpatil #msme #loan
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा